भारताच्या अश्विनला टाकले मागे
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत एक मोठा विक्रम नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन यांना मागे टाकत लियॉन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा आठवा गोलंदाज ठरला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दुसर्या डावात काइल मेयरला बाद करताच नॅथन लियॉनने अश्विनला मागे टाकले. आता त्याच्या नावावर 446 कसोटी विकेट्स झाल्या आहेत. त्याचबरोबर अश्विनच्या नावावर 442 कसोटी विकेट आहेत. नॅथन लियॉनने आपल्या 111व्या कसोटी सामन्यात ही विशेष कामगिरी केली आहे. दुसरीकडे, अश्विनने भारतासाठी आतापर्यंत 86 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 442 फलंदाजांची शिकार केली आहे. नॅथन लियॉन सध्या ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियन संघासाठी बर्याच सामन्यात मॅचविनिंग गोलंदाजी केली आहे.
कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
मुथय्या मुरलीथरन (श्रीलंका)- 800, शेन वॉर्ने (ऑस्ट्रेलिया)- 708, जेम्स अँडरसन (इंग्लंड)- 668, अनिल कुंबळे (भारत)- 619, स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)- 566, ग्लेन मॅक्ग्राथ (ऑस्ट्रेलिया)- 563, कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज)- 519, नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया)- 446, आर. अश्विन (भारत)- 442, डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)- 439.