गूंज संस्थेचे सामाजिक बांधिलकी
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील खरसई मराठी या शाळेत 2 डिसेंबर रोजी रोजी शालोपयोगी दप्तरे आणि शैक्षणिक साहित्याचे देशातील 32 राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणारी दिल्ली येथील गूंज या सामाजिक संस्थेतर्फे नुकतेच वाटप करण्यात आले.
प्रथम शाळेचे मुख्याध्यापक बालाजी राठोड यांनी संस्थेचे प्रतिनिधी मयूर नाक्ती यांच्यासह एसएमसी समिती सदस्य व ग्रामस्थांचेही स्वागत केले. संस्थेचे सदस्य यांनी गूंज संस्थेचे दिल्ली येथील सामाजिक संस्थेचे देशांमध्ये जे विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषीविषयक, तसेच जलसंधारणविषयक उपक्रम चालू आहेत, त्याची माहिती दिली. संस्थेचे प्रमुख अंशू गुप्ता यांच्या संकल्पनेतून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक सक्षम व्याक्तीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे, ही भावना बोलून दाखवली. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आवर्जून उपस्थित होते. शाळेचे शिक्षक अशोक सानप यांनी शाळेची शैक्षणिक माहिती गूंज संस्थेला दिली. आभार जयसिंग बेटकर यांनी मानले.







