| कोल्हापूर | प्रतिनिधी |
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी मंगळवारी होणार आहे. यामुळे राणेंचा कोठडीमधील मुक्काम वाढण्याबरोबरच त्यांना छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशाचत आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळला. संतोष परब हल्ल्याप्रकरणी गोट्या सावंत संशयित आरोपी आहेत. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नितेश राणेंचा मुक्काम वाढला
