अलिबाग शहरात मृतदेह आढळल्याने खळबळ

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग शहरातील जुन्या नगरपालिकेसमोर असलेल्या निशा अपार्टमेंट इमारतीच्या पंपहाऊस मध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर इसमाचा मृत्यूला दोन तीन दिवस झाले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की हत्या करण्यात आली आहे याबाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत. अलिबाग पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version