| पनवेल | र्वाताहर |
पनवेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 30 ते 35 वर्षे, रंग सावळा, अंगाने सडपातळ, केस मोठे व काळे तसेच दाढी-मिशी वाढलेली असून, अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे 27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळंके यांच्याशी संपर्क साधावा.