। गुहागर । प्रतिनिधी ।
गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये एक कोल्हा मृत अवस्थेत आढळून आला. हा मृत कोल्हा बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे तो सडू लागला असून त्याला जंतूही पडले. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले असून परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली. हे पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्यामुळे लोकांना ताप, उलट्या, जुलाब, पोटदुखीमुळे लोकांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. झोंबडीचे सरपंच अतुल लांजेकर, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्या मयुरी लांजेकर, ग्रामसेवक गोरख सोनवणे, दीपक गायकवाड, आशासेविका साक्षी सरदेसाई यांनी घटनास्थळी जाऊन लोकांची त्वरित काळजीपूर्वक दक्षता घेतली व वाडीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या. तर ग्रामपंचायतीमार्फत विहिरीतील पाणीउपसा करून स्वच्छतेचे काम केले.







