पाली अंबा नदीत चक्क मेलेल्या कोंबडया व मासळी,

पाणी दुषित, जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळे अंबा नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सबंध पाली गावाला पाणीपुरवठा करणारी अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कारण कधी कारखान्याचे दूषित पाणी, तर कधी घाण व केरकचरा यामुळे नदी प्रदूषित होतेय, अशातच आता काही मासळीवाले व चिकन व्यावसायिक न विकला गेलेला माल आणि सडलेली मासळी व मेलेल्या कोंबड्या नदित रात्री फेकून देतात. सध्या नदीचे पाणी वाहते नाही. बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. परिणामी या मेलेल्या कोंबड्या व मासळी नदीपात्रात तिथेच पडून राहते व सडते त्यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पालीकरांना पुरविले जाते. परिणामी रोगराई पसरण्याचा धोका देखील आहे.

Exit mobile version