आरटीई प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत मुदतवाढ

। रायगड । प्रतिनिधी ।

खासगी शाळांमध्ये आरटीईच्या राखीव 25 टक्के प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली. खासगी शाळांतील आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (दि.17) मेपासून सुरू झाली होती. (दि.31) मे रोजी प्रवेश प्रक्रियेची मुदत संपली असून असंख्य पालकांना विविध कारणांमुळे अर्ज करता आला नसल्याने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. (दि.4) जूनपर्यंतची मुदतवाढ अंतिम असून त्यानंतर मुदत वाढवून मिळणार नाही, असे गोसावी यांनी नमूद केले आहे. आरटीई प्रवेशाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. यात (दि.31) मेपर्यंत नऊ हजार 210 शाळांमध्ये एक लाख पाच हजार 161 जागांसाठी दोन लाख 27 हजार 200 अर्ज आले आहेत. यंदा आरटीई प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेकरिता पालकांनी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

Exit mobile version