| पनवेल | वार्ताहर |
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कर्णबधिर मुलांच्या विशेष शाळेची सहल कर्नाळा येथील आदित्य फार्म हाऊस येथे काढण्यात आली होती. सहलीमध्ये रोटरी शाळेतील 46 विद्यार्थ्यांनी व संजीवनी स्कूल रसायनी या शाळेतील 33 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या फार्म हाऊस मधील स्विमिंग पूल मध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. या सोबतच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध गेम्स चे आयोजन करण्यात आले होते.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सई पालवणकर व सेक्रेटरी डॉ. बागडे यांनी मुलांचे विविध गेम घेतले व इनरव्हिल क्लब तर्फे सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे व आईस्क्रीमचे वाटप केले. तसेच श्री स्वप्निल मोरे यांनी विद्यार्थ्यांना झाडांची माहिती सांगितली. सहलीच्या ठिकाणी संस्थेचे सचिव प्रमोद वालेकर, संस्था सदस्य चारुदत्त भगत यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका शैला बंदसोडे यांनी संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर क्लबच्या माजी अध्यक्षा वृषाली सावळेकर यांचे सहलीसाठी फार्म हाऊस आणि विद्यार्थी व कर्मचारी वर्गाच्या नाष्टा तसेच भोजनाची सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानले. अशाप्रकारे मोठ्या उत्साहात रोटरी स्कूलमधील विशेष मुलांची सहल यशस्वीरित्या संपन्न झाली.