। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुका पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी संघाला रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने निवृत्त वेतन धारकांना वाढीव 11 टक्के महागाई भत्ता व राहिलेला फरक दिवाळीपूर्वीच अदा झाल्याने उपरोक्त संघाने जिल्हा कोषागार कार्यालयाचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष नथुराम पाष्टे,सचिव बाळ उभारे,संचालक विनायक सापळे यांनी अलिबाग येथे भेट घेऊन त्यांना आभारपत्र देऊन त्यांचे धन्यवाद मानले आहेत.