। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील साटेली भेडशी सुतारवाडी येथील गिरी गोपाळ मयेकर (52) यांचा शेतात गवत जाळण्यासाठी घातलेल्या आगीत गुदमरून मृत्यू होण्याची दुदैवी घटना घडली आहे. ते दुपारी घरी न आल्याने सायंकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी काही नातेवाईक गेले असता ते मृतावस्थेत आढळून आले होते. याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
साटेली भेडशी सुतारवाडी येथील कृष्णा मयेकर हा परमे रोड येथे लागून असलेल्या फटी धर्णे यांच्या मालकीच्या जमीनीत वाढलेल्या गवताला आग घालून जमीन साफसफाई करायला सांगितले होते. त्यामुळे दुपारी कृष्णा मयेकर हे शेत जमीन बागायतीमध्ये आग लावून गवत जाळणे सुरू होते. मात्र, दुपारची वेळ असल्याने वार्यामुळे आग भडकली आणि धूर तसेच आगीच्या ज्वाळांमुळे ते गुदमरून खाली कोसळले. त्या आगीतच गुदमरून त्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.