तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

तोल जाऊन खाली पडल्याने लोखंडी सळई पार्श्‍व भागाकडील गुदद्वारामध्ये घुसून दुखापत होऊन इन्फेक्शन झाल्याने 28 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आदई येथे राहणार्‍या विकी दीपक गिरी हा पळस्पे येथे त्याच्या कामाच्या ठिकाणी दुपारी जेवण करून भिंतीवरती बसण्याकरिता गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला व लोखंडी सळई त्याच्या पार्श्‍वभागाकडील गुदद्वारामध्ये घुसल्याने दुखापत झाली. त्याला एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे दाखल करण्यात आले. इन्फेक्शन झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version