। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील पळस्पे परिसरात एका टँकरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पनवेल गोवा लेनवरुन अमलेशकुमार नगिनाप्रसाद (33) हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकल घेवून जात असताना पळस्पे ब्रीज खाली एका टँकरने अचानकपणे त्याच्या टँकरचा वेग कमी केल्याने अमलेशकुमार हा सदर टँकरला जावून धडकला. यात तो गंभीररित्या जखमी होवून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.