दुर्मिळ कस्तुरी मांजराचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातील मोर्बा रस्त्याच्या मध्यभागी बुधवारी (दि.7) सकाळच्या सुमारास एक दुर्मिळ कस्तुरी मांजर (सिव्हेट) रस्ता ओलांडत असताना चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गोद नदी पुलाच्या अलिकडे घडली. दरम्यान, रस्त्याच्या कडेला पडलेला हा प्राणी पाहून काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही नागरिकांनी अज्ञानामुळे त्याला वाघाचा बछडा समजून भीतीपोटी पळ काढला. मात्र, नंतर जाणकारांनी पाहणी केल्यानंतर हा प्राणी कस्तुरी मांजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, तोपर्यंत एका निरुपद्रवी वन्यजीवाचा प्राण गेला.

Exit mobile version