| महाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील साहीलनगर ते गांधारापाले दरम्यान बौध्दविहार येथे दुचाकी (एमएच-04-एमबी-9215) चालक मुंबईकडून महाडकडे जात असताना अतिवेगाने गाडी चालवत रस्त्याच्या परीस्थितीचा अंदाज न आल्याने येथील दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून मागच्या सीटवर बसलेला गंभीर जखमी झाला आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार विशाल वाघाटे हे करीत आहेत.