कामगाराचा पडून मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

सोलर फिटिंगचे काम करीत असताना 40 फुटांवरून खाली पडून एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये घडली असून या प्रकरणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि कंपनी मालक यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . प्लॉट नं . एल / 106 , रत्नेश इंजिनियरिंग प्रा. लिमी येथे 40 फूट उंचीवरील पत्र्यावर सोलर फिटिंगची कामे करीत असतांना तेथील कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेता कामगारांना कोणतेही सुरक्षिततेची साधने न पुरवल्याने तेथे काम करणारा कामगार शुभम देडे वय ( 30 ) हा सहकार्‍यांसह 40 फूट उंचीवर काम करीत असतांना त्याचा पत्र्यावरून तोल जाऊन तो खाली पडून त्यात तो गंभीररित्या जखमी होऊन मृत्यू पावल्याने संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि कंपनी मालक यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Exit mobile version