| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील शिरवली-भेकरेवाडी या ठिकाणी धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली.
सातजण शिरवली-भेकरेवाडी येथील धबधब्यावर गुड्डू कुमार (रा. नितळस, मूळ- बिहार) पोहण्यासाठी गेले होते. दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान त्यांनी येथील कुंडात उडी मारली. गुड्डू कुमार याला पोहता येत नव्हते. यावेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो त्यात अडकला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मृतावस्थेत काम सुरू असलेल्या कामगारांना दिसला. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.