| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील संभे गावचे रहिवासी असणारे व सामाजिक कार्यकर्ते देवजी अंबाजी सानप यांचे शनिवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी वयाच्या 64 व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून, त्यांचे दशक्रिया विधी 12 फेब्रुवारी रोजी, तर अंतिम धार्मिक विधी 15 फेब्रुवारी रोजी निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.