| पनवेल | वार्ताहर |
खारघर रेल्वे स्टेशन फलाट क्रं.1 या ठिकाणी सीएसएमटी बाजुच्या टोकाकडे लोकलच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती सफाई कामगारांकडून मिळालेल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पनवेल रेल्वे पोलिसांनी बेशुध्दावस्थेतील सदर इसमास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेले असता, तेथील डॉक्टरांनी उपाचारापूर्वीच सदर इसमाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत इसमाची उंची साडेपाच फुट असून रंग सावळा, चेहरा गोल असून अंगात हिरव्या आणि काळ्या रंगाचा हाफ टी-शर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट असून कमरेला लुंगी बांधलेली आहे. मृत इसमाच्या नातेवाईकांचा पोलिस शोध घेत असून, सदर इसमाबाबत कुणाला अधिक माहिती असल्यास रेल्वे पोलीस ठाणे फोन क्रमांक 022-27467122 किंवा पीएसआय पी.बी.जगताप मो नं 9689309035 व स.पो.उप.निरीक्षक श्रीकृष्ण वेदपाठक (9870157850) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत.