। अमरावती । प्रतिनिधी ।
अमरावती जिल्ह्याचे राजकारण सध्या चांगले तापले आहे. शनिवारी (दि. 16) दर्यापूर मतदारसंघातील खल्लार येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची प्रचार सभा सुरू असताना चांगलाच राडा झाला. नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या भिरकावण्यात आल्या असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवारी रात्री दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार या गावात नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनीत राणा यांचे भाषण सुरु असताना काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्या. याप्रकरणी 4 हल्लेखोरांना अटक केली तर, फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून घटनेची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.