उद्योजक किर्ती शहांना पितृशोक

। वाघ्रण । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील लोणघर येथील जलाराम फरसाण मार्टचे प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते किर्ती शहा यांचे वडील मुरजी गागंजी शहा यांचे मंगळवार (दि.23) अकस्मित निधन झाले. ते 74 वर्षांचे होते.

मुरजी शहा यांनी 40 वर्षाहून अधिक काळ किराणा मालाचे मालक/दुकानदार म्हणून प्रसिद्धी मिळविली होती. कामार्ले ते फोफेरीपर्यंत गावांना त्यांच्या बद्दल विश्‍वासहार्ता होती. मुरजी शहा यांच्या निधनानंतर त्यांच्या परंपरेनुसार मुंबई आणि अलिबाग येथे शोकसभा झाल्या. मुरजी शहा यांच्या मागे कर्ती आणि भाऊ मनोज शहा असे दोन मुले, सूना, नातवंड असा परिवार आहे.

Exit mobile version