| भाकरवड | वार्ताहर |
स्वर्गीय शंकर सखाराम पाटील, विमल पाटील, भास्कर पाटील, विजयकुमार शहा, जसुमती शहा व स्वर्गीय कैलास वाघमारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडखळ येथील श्री हनुमान मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पनवेल येथून डॉ. राजेश अत्तरदे, उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते चेतन शहा, हितेश शहा, प्रमोद शहा, टेक्निशियन दीपक ठोकल, दीप्ती यादव, झिनजे, गौरी रासकर, शबाना शेख, शर्मिला मोकल, अतुल म्हात्रे, गणेश आकोटकर, मा.ही.पाटील गुरुजी इ. मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार वरदानी माता मित्र परिवार च्या वतीने करण्यात आला या भव्य रक्तदान शिबिरात 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले.एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे पनवेल यांच्या सहकार्यातून वरदानी माता मित्र परिवार यांच्या आयोजना हे शिबीर घेण्यात आले.
यावेळी कुर्डुस माजी सरपंच संदीप पाटील, विश्वास पाटील, बासरीवादक सचिन धुमाळ यांनी सपत्नीक भेट दिली. मंडळाचे सर्वेसर्वा नरेश पाटील,अतुल पाटील, महेश पाटील,रणजीत पाटील, विद्याधर पाटील, दत्तात्रेय पाटील, गोपीनाथ पाटील, गजानन पाटील, स्वानंद कोठेकर,वैभव पाटील, यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन जिविता पाटील तर आभारप्रदर्शन जीवन पाटील यांनी केले.