। सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या सुकेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते नारायण आबा सुटे यांचे शनिवार (दि.4) रोजी दुपारी 12.5 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 65 होते. त्यांच्यावर रात्री 9 वाजता सुकेळी येथिल वैकुंठभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच ऐनघर विभागातील मोठ्या संख्येन जनसमुदाय उपस्थित होता. कै. सुटे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, भाऊ, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा मित्र परिवार आहे. कै. सुटे यांचे दशक्रिया विधी सोमवार, दि. 13 तर उत्तरकार्य, गुरुवार, दि.16 रोजी सुकेळी येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
नारायण सुटे यांचे निधन
