पुंडलिक धोंड यांचे निधन

। पनवेल । प्रतिनिधी ।
रायगड व नवी मुंबईत गेली 50 वर्षे प्रिंटींग व्यवसायात नामांकित असलेल्या गुरुदेव पॅकेजिंग अँन्ड प्रिंटींग प्रा. लि. चे संस्थापक, संचालक पुंडलिक लक्ष्मण धोंड (93) यांचे निधन झाले. रोटरी क्लब ऑफ न्यु पनवेलचे ते चार्टर मेंबर होते. त्यांनी आपल्या अध्यक्ष कारकिंदीत रोटरीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले होते. त्यांच्या पश्‍चात मुलगी माधवी गव्हाणकर, नातु अभिषेक, अनिकेतन, सुविदय व सून सुरुची असा परिवार आहे. अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Exit mobile version