| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथील रमाकांत चिंतामण गोंधळी यांचे गुरुवारी 1 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. निधनसमयी ते 67 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांचे ते धाकटे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना, जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 10 ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र चिरनेर खाडी येथे होईल. तर उत्तरकार्य विधी 13 ऑगस्ट रोजी चिरनेर कातळपाडा येथील राहत्या घरी दुपारी ठीक 12 वाजता होणार असल्याची माहिती गोंधळी परिवाराकडून देण्यात आली आहे.