| चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. तीन दिवस चालणार्या या उत्सवात ग्रामभिक्षा फेरी, दत्तगुरूंचा जन्मोत्सव, भजन, कीर्तन, हरिपाठ व महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सध्या दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या उरण पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पाटील, शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, संतोष ठाकूर, संजूकुमार भगत, संतोष चिर्लेकर, प्रियांका गोंधळी, अलंकार परदेशी, रमेश फोफेरकर, बबन गोंधळी, किशोर भगत, सुरेश म्हात्रे, दत्ता मोकल, अनिल महाराज, विश्वास मोकल, कृष्णा म्हात्रे, समीर गोंधळी, हसूराम म्हात्रे, हरिश्चंद्र गोंधळी आदींच्या हस्ते दिपोत्सोवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्री दत्तगुरूंच्या मंदिरात हजारो दीप प्रज्वलित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे निवेदन समाधान म्हात्रे यांनी केले.