| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल येथील विद्या विजय रांजणकर यांचे गुरुवारी (दि.16) निधन झाले. निधनासमयी त्या 69 वर्षांच्या होत्या. त्या पत्रकार भारत रांजणकर व संतोष रांजणकर यांच्या काकी होत. त्यांच्यावर मुरूड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगरसेवक, माजी नगरसेवक, यांच्यासह मुरूडमधील सर्व स्तरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, दोन कन्या, दीर, भावजय, जावई, नात असा परिवार आहे. दशक्रिया विधी शनिवारी (दि.25), तर मंगळवारी (दि.28) उत्तरकाय करण्यात येणार असल्याचे रांजणकर कुटुंबाच्यावतीने सांगण्यात आले.







