| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नवघर येथील गौरी बाबू शिंदे यांचे दि. 31 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 80 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अलिबाग तालुक्यातील मोडीलिपी वाचक संतोष शिंदे, अलिबाग पंचायत समितीचे कर्मचारी प्रभाकर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थिवावर 1 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईकांनी उपस्थित होते. यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटूंबात शोककळा पसरली आहे. पुण्यानुमोदन आणि शोकसभा रविवार दि.11 रोजी फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती शिंदे कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.