| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र फाऊंडेशनचे सुनील देशमुख यांचे अमेरिकेत मायामी येथे प्रदीर्घ आजाराने 4 जानेवारी रोजी निधन झाले. अमेरिकेत राहून मराठी संस्कृती फुलविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे.
मराठी साहित्य, वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्था, महिलांचे प्रश्न, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात ते कायम सक्रिय राहिले. दरवर्षी ते स्वतः मुंबई पुणे येथे महाराष्ट्र फाऊंडेशनचा बक्षीस समारंभ आयोजित करत. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर लिखाण केले आहे. नुकतेच त्यांनी ‘प्रबोधनकार ठाकरे’ यांचे विचार आणि वर्तमान’ या विषयावर पुस्तक लिहिले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रतिभा, मुले गिरीश व सुशील आणि कन्या निशा असा परिवार असून, ते अमेरिकेत राहतात.