वायनाडमधील मृतांचा आकड्यात वाढ

| वायनाड | वृत्तसंस्था |

केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री उशीरा चार वेगवेगळ्या ठिकाणांवर भूस्खलन झाले. रात्री 2 वाजेपासून सकाळी 6 पर्यंत झालेल्या भूस्खलनात चार गावे वाहून गेली. आतापर्यंत या भूस्खलनात 143 जणांचा मृत्यू झाला असून 128 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अद्याप शेकडोहून अधिक जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. रेस्क्यूसाठी आर्मी आणि हवाई दल, च्या टीम तैनात आहेत. लष्कराने रात्री उशीरापर्यंत एक हजारांहून जास्त लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. रात्रीच्या अंधाराचा रेस्क्यू करण्यास अडथळा येत असल्याने ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. आज सकाळपासून रेस्क्यूचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

Exit mobile version