चिरनेर- खारपाडा रस्त्यावर रात्री टाकले जाते डेब्रिज

| चिरनेर | प्रतिनिधी |

पर्यावरणाला हानिकारक ठरणारे मुंबईतील डेब्रिज बेकायदेशीररित्या चिरनेर साई खारपाडा मार्गावरील रस्त्यावर काही ठिकाणी जागोजागी टाकण्यात आले आहे. अवैधरित्या डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या डेब्रिजमध्ये पर्यावरण व नागरिक, जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या धोकादायक घटकांचाही समावेश असतो. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नजरा चुकवून रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर मुंबईतील डेब्रिज आणण्यात येते आहे. मुंबईतुन मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या या बेकायदेशीर डेब्रिजमुळे मात्र नवी मुंबई, पनवेल, उरणमधील काही ठिकाणी डेब्रिजचे डोंगरच निर्माण झाले आहेत. यामुळे मात्र पर्यावरण व नागरिक, जैवविविधतेचीही हानी होत आहे.

Exit mobile version