सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने विकासकामे ठप्प
| नेरळ | प्रतिनिधी |
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमधील क्ले पेव्हर ब्लॉकचा निर्णय आणखी महिन्याने घेतला जाणार आहे. फेब्रुवारी पासून पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आलेले आहेत. माथेरानमध्ये क्ले पेव्हर ब्लॉक बद्दल देखील उपसमितीकडून पाहणी करून अहवाल सादर केल्यावर निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्याचे अर्धवट थांबलेली कामे सुरू होण्याची शक्यता नाही.
दरम्यान, ई रिक्षा सुरू झाल्यास त्या चालविण्यासाठी व्यवसाय हिरावल्या गेलेल्या घोडेवाल्यांना देखील संधी देण्यावर न्यायालय विचार करील असे आश्वासन सर्वोच्य न्यायालयाच्या न्यायाधीश यांनी सांगितले आहे. माथेरानमधील पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे 22 फेब्रुवारी पासून थांबविण्यात आली आहेत. मात्र सर्वोच्य न्यायालयाने त्या बाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप घेतला नाही. ई रिक्षा देखील दिवशी सुरू होणार हे ठामपणे कोणतेही निर्देश न्यायालयाने सुनावणी मध्ये केले नाही.त्यामुळे माथेरान मधील क्ले पेव्हर ब्लॉक आणि ई रिक्षा हे दोन्ही विषय सर्वोच्य न्यायालयातील सुनावणीत निर्णयाप्रत गेले नाहीत. यामुळे विद्यार्थी आणि सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक यांचा आधार बनलेली ई रिक्षा आणखी काही काळासाठी बंद ठेवली जाणार आहे.
चार मार्चपासून पायलट प्रकल्पसाठी आणलेल्या सात रिक्षा धूळ खात पडलेल्या आहेत. त्या रिक्षा सुरू पुन्हा करण्यावर शासन निर्णय घेणार असल्याने शासनाच्या वतीने सर्वोच्य न्यायालयात प्रस्ताव द्यावा लागणार आहे. अशवपाल संघटना यांच्या रीट पीटिशन नंतर सर्वोच्य न्यायालयाने माथेरान मध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामे आठ आठवडे साठी बंद ठेवण्यात येतील असे आदेश दिले.त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा कडून बांधण्यात येत असलेला दस्तुरीं ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा साडे पाच किलो लांबीचा महात्मा गांधी रस्त्याचे काम थांबविण्यात आले.
पालिकेकडून शासनाच्या निधी मधून सुरू असलेली 11 रस्त्यांची कामे थांबविण्यात आली होती. ती कामे नायायालयाच्या आदेशाने सुरू होतील आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होईल असे वाटले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने साडे चार महिन्यांनंतर देखील कोणतीही कार्यवाही आपल्या निर्णयात घेतला नाही.आता त्याच क्ले पेव्हर ब्लॉक मुळे बनविलेले रस्ते पाहून त्यांचा टिकावपणा याबद्दल निरीक्षण नोंदवून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी एक उपसमिती नेमली आहे.या समितीच्या अहवालावर माथेरान मधील रस्त्यांवर क्ले पेव्हर ब्लॉक यांचे भविष्य अवलंबून असणार आहे.त्यानंतरच माथेरान मधील थांबवलेली कामे सुरू होऊन पूर्ण होणार आहेत. दुसरीकडे शहरातील रस्त्यांची कामे थांबवल्याने उपोषण,मोर्चा असे आंदोलन यापूर्वी झाले आहे.
घोडेवाले देखील ई रिक्षा चालक
माथेरान मधील प्रमुख वाहन म्हणून घोडे वापरले जातात.त्यासाठी शहरात 450घोड्यांना पर्यटकांना वाहून नेण्यासाठी परवाने दिले गेले आहेत.मात्र ई रिक्षा सुरू झाल्यास घोडेवाले यांचा व्यवसाय हिरावला जावू शकतो आणि त्यामुळे हात रिक्षा चालक यांच्या प्रमाणे ई रिक्षा या घोडेवाले यांना देखील चालविण्यास देण्यात याव्यात अशी मागणी अश्वपाल संघटना यांच्याकडून न्यायालयात करण्यात आली.त्यावेळी सर्वांना जगण्याचा अधिकार असून त्याच न्यायाने घोडेवाले यांना देखील ई रिक्षा चालविण्यात योग्य निर्णय घेण्यात येईल असे निरीक्षण नोंदवले आहे.
न्यायालयातील निरीक्षणे..
खंडपीठाने संनियंत्रण समितीला माथेरानमधील मान्सूनच्या सुरुवातीचा पेव्हर ब्लॉक्सवर होणारा परिणाम तपासून 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. खंडपीठाने मौखिकपणे निरीक्षण केले की माथेरान हे देशातील एकमेव पादचारी हिल स्टेशन आहे आणि त्या शहरांच्या वाहतुकीची समस्या पाहता मसुरी किंवा नैनिताल सारखेच नशीब मिळाल्यास ते दुर्दैवी ठरेल. खंडपीठाने पुन्हा असे निरीक्षण नोंदवले की हाताने ओढलेल्या रिक्षाला तत्वतः विरोध आहे आणि म्हणून त्यांना माथेरानची परंपरा आणि इतिहास लक्षात घेऊन काही पर्याय उपलब्ध करून देण्याची गरज आहे.