। उरण । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी यांनी अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवून जसखार ग्रामपंचायत सरपंच काशीबाई ठाकूर यांना अपात्र ठरविले होते. त्याविरोधात काशीबाई ठाकूर यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग, मुंबई यांच्याकडे अपील करून दाद मागितली. त्यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी या निर्णयाला स्थगिती दिल्याने सरपंचपदी काशीबाई ठाकूर यांना कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे काशीबाई ठाकूर यांनी गुरुवारी पुन्हा सरपंचपदाचा पदभार स्वीकारला आहे.