शिवशक्ती आणि भीमशक्ती युतीची घोषणा

। मुंबई । वृत्तसंस्था ।

अनेक दिवस चर्चेत असलेली शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज सोमवारी (दि.23) करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या युतीसाठीच्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर अखेर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंतीचे औचित्य साधून या युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी ठाकरे गट आणि वंचित आघाडीचे नेते उपस्थित होते.

दुपारी साडेबारावाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकारपरिषद आंबेडकर भवन, नायगाव, दादर (पूर्व) येथे झाली. महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या राजकारणातील हे एक क्रांतिकारी पाऊल आहे. आंबेडकर आणि ठाकरे ही दोन नेत्यांची किंवा दोन पक्षांची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मोठ्याप्रमाणात आहे. त्या दोन विचारांची ही युती आहे आणि हे बाळासाहेब ठाकरे यांचं खूप जूनं स्वप्न होतं.

ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होते. यापूर्वी असा प्रयोग झाला. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आहोत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत.

उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू एकत्र येणार आले आहेत. हा खूप मोठा संदेश आहे. पुढे महाराष्ट्रात आणखी खूप काही घडणार आहे.

संजय राऊत
शिवसेना (ठाकरे गट) नेते
Exit mobile version