कोरोना रुग्णांमध्ये घट; निर्बंध शिथिल करण्याचे केंद्राचे राज्यांना पत्र

। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोना प्रकरणात सातत्याने घट होत असल्याने केंद्र सरकारने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना निर्बंध शिथिल करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध हटवण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. निर्बंधांची समीक्षा करावी असे आदेश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “भारतात कोरोना रूग्णसंख्या २१ जानेवारी पासुन सतत घसरत आहे. अतिरिक्त कोरोना निर्बंधांची समीक्षा करा आणि त्यात सुधारणा किंवा आवश्यकता नसल्यास ते निर्बंध हटवा. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे.

Exit mobile version