मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट

। मुंबई । प्रतिनिधी ।

शहरात एकीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये कोरोनामुळे 21 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये होणारी वाढ कमी असली तरी दर दिवशी होणार्‍या मृत्यूच्या संख्येत मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईमध्ये गणेशोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा केला जात आहे. पण कोरोनाचे संकट अद्याप संपलेलं नाही. गणेशोत्सवामुळे मुंबईतील बाजारात, गणेश मंडळांच्या परिसरात लोकांची गर्दी जमत असून त्यावर कोणतेही नियंत्रण नाही.

Exit mobile version