अलिबाग तालुक्याच्या रुग्णसंख्येत घट

22 नवे रुग्ण, 110 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येने चिंता वाढतच असताना रविवारी मात्र थेट 5 पट घटत 22 रुग्णांवर आल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी 22 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 110 जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी तालुक्यात आढळून आलेल्या 22 रुग्णांमध्य चेंढरे, अलिबाग शहर, वरसोली, दिघोडे, कुरुळ, आगरसुरे, पेझारी, आग्राव, शहाबाज, चौल, महाजने, राजमळा या गावातील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 22 हजार 569 झाली आहे. 619 रुग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 20 हजार 895 जण कोरोनामुक्त झाले असून सद्यस्थितीत 1 हजार 055 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version