6 जणांचा मृत्यू, 502 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्ण्संख्येत घट झाली असुन शनिवारी (19 जून) रोजी कोरोनाच्या 375 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 502 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
आज पनवेल शहरात 59, पनवेल ग्रामीणमध्ये 36, अलिबागमध्ये 36, खालापूरमध्ये 28, उरणमध्ये 4, पेणमध्ये 44, महाडमध्ये 13, कर्जतमध्ये 9, रोह्यात 44, मुरुडमध्ये 24, माणगावमध्ये 24, म्हसळ्यात 11, सुधागडमध्ये 14, श्रीवर्धनमध्ये 13, तळामध्ये 1 अशा रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 41 हजार 291 झाली आहे. यापैकी 1 लाख 32 हजार 288 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 3 हजार 437 वर गेला आहे. सद्यस्थितीत 5 हजार 566 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.