| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील घसवड गावात पाटील परिवाराचे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले खंडोबा यांचे मल्हारी मार्तंड देवस्थान निर्माण होत आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा शनिवार, दि. 4 रोजी सायं. चार वाजता संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार जयंत पाटील यांच्यासमवेत माजी आ. पंडित पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, माजी सभापती दिलीप भोईर, चित्रा पाटील, शहाबाजचे सरपंच धनंजय म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.

घसवड गावातील पाटील परिवाराचे कुलदैवत हे अडीचशे ते तीनशे वर्षांपासून गुरव बाळाजी पाटील यांचे घरी स्थित होते. मात्र आज त्यांचे भव्य दिव्य अशा स्वरूपात मंदिर स्थापन झाले आहे. या मंदिर उभारणीसाठी पाटील परिवारातील घसवड, झिराड, नांदाईपाडा, फकीरपाडा, करंजा, आक्षी येथील एकूण 167 कुटुंबियांनी व इतर गावांतील दानशूरांनी आर्थिक व वस्तुरूपाने मदत केली आहे. मंदिर उभारणीसाठी अॅड. आस्वाद पाटील व धनंजय यांचे भरीव योगदान आहे.