पालकमंत्र्यांच्या हस्ते फिटनेस क्लबचे लोकार्पण

। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने सुतारवाडीतील गीताबाग येथे उभारण्यात आलेल्या मार्तंड फिटनेस क्लबचा लोकार्पण आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, मधुकर पाटील, विनोद पाशिलकर, महेंद्र पोटफोडे, सुरेश महाबळे, राकेश शिंदे, श्रीकांत चव्हाण, मनोज शिर्के, अनिल भगत, विजय कामथेकर, येरळ सरपंच विमल दळवी, कोलाङचे पी. एस. आय. सुभाष जाधव तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा ग्रामस्थ सदस्य उपस्थित होते.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले गेल्या काही दिवसांपूर्वी पाच ग्रामपंचायतींनी मागणी केल्याप्रमाणे सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने या ठिकाणी सुसज्ज अशी व्यायामशाळा सुरु झाली आहे. मुलांना शारिरीक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. पाच ही ग्रामपंचायतींच्या युवकांना ही व्यायामशाळा प्रेरणादायी ठरेल. खासदार सुनिल तटकरे साहेबांनी रोहा येथे कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने पार पाडल्या होत्या. सुनिल तटकरे साहेबांना कबड्डी क्षेत्रात राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. क्रिडा क्षेत्रात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविले जातील. या ठिकाणी कबड्डी, खो – खो, बॅडमिंटन चे मैदान लवकर सुरु करण्याचा मानस असून महिलांच्या संरक्षणासाठी ज्यूडो, कराटे, त्वाकायंडो चे प्रशिक्षण सुरु करण्याची मागणी आदिती तटकरे यांच्याकडे केली.

लोकार्पण सोहळा प्रसंगी पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या युवकांची अनेक दिवसापासूनची इच्छा सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जावून प्रतिष्ठान ने हे काम केले आहे. गावोगावच्या लोकांच्या सहकार्याने तटकरे कुटुंबियांची नाळ जोडलेली आहे. व्यायाम शाळेच्या माध्यमातून रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध झाली असून तरुणांसाठी हे हक्काचे व्यासपिठ आहे माझ्या आजीने आणि आईने राजकरणा पलीकडचे संबंध जोपासले आहेत . या व्यायाम शाळेत शरीर मजबुत आणि सुदृढ होण्यासाठी चांगल्या पद्धतीने सराव करण्यासाठी आर्थिक साहित्य उपलब्ध करून दिले जातील.
या ठिकाणी अनिकेत भाईंनी सांगितल्याप्रमाणे आपत्ती निवारण केंद्र सुरु करण्याबाबत जरूर प्रयत्न करणार असून सहा वर्षापूर्वी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानची स्थापना झाल्या नंतर या प्रतिष्ठानच्या वतीने सहा म्बुलन्स देण्यात आल्या. तसेच एक अ‍ॅम्ब्युलन्स खेड मध्ये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मधुकर पाटील यांनी ही उत्तम मार्गदर्शन या वेळी केले. आणि सर्वांचे लाडके आमदार अनिकेतभाई तटकरें यांना एक दिवस अगोदरच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version