पालकमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे आणि सामाजिक कार्यकर्ते राकेश शिंदे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या चिंचवली एसटी थांब्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जि.प. सदस्य दयाराम पवार, भाई टके, राकेश शिंदे, महेंद्र पोटफोडे, नरेंद्र जाधव, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, उपसरपंच श्रीकांत चव्हाण, गणेश वाचकवडे, मनोज शिर्के, दर्शन तेलंगे, चिंचवली सरपंच दर्शना पवार, प्रसाद येरुणकर, शिरिष येरुणकर, महेश येरुणकर, सुनिता मालुसरे, उषा मालुसरे, आदी मान्यवर उपस्थित होते.