| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-कशेळे भीमाशंकर राज्यमार्गावरील अंजप गावाच्या हद्दीत शनिवारी (दि.8) सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात डोंगरपाडा येथील अजित शरद भालचिम (18) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अजित हा भाऊ अक्षय आणि बहीण कामिनी यांच्यासह दुचाकीवरून गावाकडे जात असताना समोरून येणाऱ्या केटीएम दुचाकीला धडक झाली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना कशेळे ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अजितचा मृत्यू झाला. दरम्यान, केटीएमस्वार मुंबईतील पर्यटक असल्याची माहिती असून तो घटनास्थळावरून पसार झाला. कर्जत पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असून, अपघातामुळे डोंगरपाडा गावावर शोककळा पसरली आहे.







