शेकापतर्फे जिल्हा रुग्णालयाला आयसीयू युनिटचे लोकार्पण

रायगड बाजारचे चेअरमन शेकाप युवा नेते नृपाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
देशात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. बऱ्याच रूग्णालयांमध्ये बेडस्, ऑक्सिजन आणि वैद्यकिय सुविधांची कमतरता जाणवत आहे. कोरोना रूग्णांलयांसाठी मदतीसाठी एक पाऊल पुढे येत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून शेकाप सरचिटणीस आ जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या वतीने एक कोटी रुपयांचे १५ बेडचा अद्ययावत आयसीयू युनिट जिल्हा सामान्य रुग्णालयास लोकार्पण करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते, उद्योजक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल जयंत पाटील यांनी याचे उद्घाटन केले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट येण्याची दाट शक्यता लक्षात घेता आपण हे युनिट कायम स्वरूपी जिल्हा सामान्य रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ प्रमोद गवई, नगरसेवक प्रदीप नाईक, अनिल चोपडा, सुरक्षा शाह, वृषाली ठोसर, आयएमए अलिबागचे अध्यक्ष डॉ विनायक पाटील, सोहम वैद्य, सतिश म्हात्रे, डॉ सागर खेदू आदी उपस्थित होते.

स्व. सुलभाकाकू प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ आयसीयु युनिट आ जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या मार्गदर्शाखाली तर स्व गौरी तथा साधनाताई संजय वैद्य यांच्या स्मरणार्थ लहान मुलांसाठीच आयसीयू युनिटचे लोकार्पण करण्यात आले.

कोरोना साथीत शेकापच्या  चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात आयसीयू उभारून शासनाला जे काही सहकार्य करण्यासाठी  उपक्रम राबविला आहे तो स्तुत्य उपक्रम आहे. गेले अनेक वर्ष पाटील कुटुंबीयांनी सामाजिक कार्याचा एक तर्‍हेचा वारसा निर्माण केला आहे तो जपण्याचे काम पुढील पिढी करते आहे हे स्तुत्य आणि अभिमानास्पद आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
– सुनिल तटकरे,खासदार

पहिल्यांदाच पोर्टेबल एक्स रे मशीन
चित्रलेखा पाटील यांच्या वतीने देण्यात आलेल्या आयसियु बेड सोबत देण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्यात एका पोर्टेबल एक्स रे मशीनचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा प्रकारची मशीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे या मशीनचा रुग्णांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. तसेच एक्स रे काढण्यासाठी रुग्णांना हलविण्याची गरज पडणार नाही असे मत चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.

Exit mobile version