कोमसाप मुरुड-जंजिरा शाखेतर्फे आठवणींची दीप-संध्या मैफिल

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
कोकण मराठी साहित्य परिषद, मुरुड शाखेतर्फे (23)उषा खोत यांच्या निवासस्थानी दीपावलीनिमित्त आठवणींची दीप-संध्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोमसापचे मुरुड-जंजिरा शाखाध्यक्ष संजय गुंजाळ, अरुण बागडे, डॉ. रवींद्र नामजोशी, नैनिता कर्णिक, उषा खोत, दीपाली दिवेकर यांनी सरस्वती पूजन करून केले. उषा खोत यानी उपस्थिताचे स्वागत केले.

प्रसाद चौलकर, ओवी पाटील, स्वरांगी पेंडसे, रुद्धी भगत, शिवानी सुभेदार, नैनिता कर्णिक, ओम जोशी, प्रतिभा जोशी, श्रुती मसाल, शिवम चव्हाण, प्रसाद चव्हाण, आशुतोष कर्णिक, दीपाली दिवेकर, प्रसाद चौलकर, आशिष पाटील, योगेश दवटे, सिद्धेश लखमदे यांनी कविता, अभिवाचन व अनुभव कथन करून उपस्थितांची मने जिंकली. आझादी का अमृत मोहोत्सव या केंद्र सरकारच्या मोहोमे अंतर्गत 21000 हजार किलोमीटर अंतर 75 दिवस बाईकवरून यशस्वीरित्या पार करणार्‍या प्रसाद चौलकर यांचा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता पेंडसे तर सिद्धेश लखमदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version