दीपक तेंडुलकर यांचा राजीनामा

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा अष्टमी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रोहा शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख दीपक तेंडुलकर यांनी आपल्या शहर प्रमुखपदासहित शिवसेना सदस्यत्वपदाचा जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आपल्या राजीनामा पत्रात शहर प्रमुख दीपक तेंडुलकर यांनी कोणत्याही नेत्यांवर आरोप न करता सदर राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे नमूद केले आहे. कित्येक वर्ष शहर प्रमुख पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभारदेखील मानले आहेत. पक्ष संघटना बळकट करणेकामी वेळ देता येत नसल्यामुळे मी माझ्या शहर प्रमुख आणि शिवसेना सदस्यपदाचा दक्षिण जिल्हा प्रमुख या नात्याने आपल्याकडे माझा राजीनामा सुपूर्द करत आहे, असे संबधित राजीनामा पत्रात शहर प्रमुख दीपक तेंडुलकर यांनी नमूद केले आहे.

Exit mobile version