विजय निश्चित! चित्रलेखा पाटील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील निवडणूकीच्या रिंगणात असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे व काँग्रेसचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष, ठाकरे शिवसेना पक्ष, काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदी पक्षांनी एकजूट केली असून आता विजय निश्चित झाला आहे. परिणामी, अधिकृत उमेदवार म्हणून चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा मिळताच आघाडीतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जल्लोष केला.

Exit mobile version