वीर वाजेकर महाविद्यालयात पदवी ; प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

। उरण । वार्ताहर ।
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महलण विभाग फुंडे येथे मुंबई विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य हंसराज थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील हे उपस्थित होते.
यावेळी आ. बाळाराम पाटील म्हणाले की,’ विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून यशाची वेगवेगळी शिखरे गाठावीत.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपल्या विभागातील विद्यार्थी प्रकल्पग्रस्त असून वेगवेगळे आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनी ठेवावी. आपल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करून भविष्यात महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान द्यावे.सदर कार्यक्रमात बीए बी कॉम बीएससी बीएससी आयटी बीएमएस एम ए एम कॉम परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र वितरण डॉ. हंसराज थोरात व आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी जी पवार यांनी करून दिली.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. आर.डी कांबळे यांनी आभार मानले. डॉ. सुजाता पाटील व डॉ. विद्या नावडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस बी ओहोळ उपप्राचार्य डॉ.विलास महाले उपप्राचार्य डॉ.प्रा.घोरपडे यु. टी सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर सेवक , विद्यार्थी, पत्रकार,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version