। उरण । वार्ताहर ।
सहकार चळवळ,कामगार संघटना, शेतकर्यांना त्यांच्या हक्काची जाणीव, आगरी समाजाचे संघटन, स्वधर्माबद्दल प्रेम आणि विविध चळवळीद्वारे समाजप्रबोधन करून वाजेकर शेठ यांनी समाजात आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यांचे कार्य या पुढील पिढीसाठी ही प्रेरणादायी असेल असे प्रतिपादन आमदार बाळाराम पाटील यांनी केले. तसेच ह्या परिसरातील विकासाचे वाटेकरी आपणास व्हायचे असेल तर आपल्याला दर्जेदार आवश्यक शिक्षण उपलब्ध करावे लागेल व त्यासाठी परिसरातील सर्व स्तरातील मान्यवरांनी मतभेद विसरून एकत्र यावे लागेल व आपण गुणवत्ता धारक नवीन पिढी घडवूया असे विचार मांडले.
रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय आणि कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाजेकर पुण्यतिथी आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृष्णा कडू चेअरमन फुंडे हायस्कूल, सुधीर घरत जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, मोहन पाटील प्राचार्य तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.पी. जी पवार यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले. सुधीर घरत, जनार्दन भोईर, संतोष पवार, कृष्णाजी कडू यानी आपले विचार व्यक्त केले. कार्याध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी अहवाल वाचन केले. मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे पारितोषिक वितरण संपन्न झाले.जिमखाना प्रमुख डॉ.विलास महाले यांनी क्रीडा विभागाचे अहवाल वाचन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सुजाता पाटील यांनी सांस्कृतिक विभाग अहवाल वाचन केले. प्रा.यू. टी.घोरपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, दिपक ठाकूर, जिवन गावंड, माधव बंडा, रमाकांत म्हात्रे, यशवंत ठाकूर, नितीन कमलाकार ठाकूर, मीनाक्षी म्हात्रे, सीमा घरत, गोपाळ पाटील, सदानंद गायकवाड चंद्रशेखर म्हात्रे,उमेश म्हात्रे, दिपक तांडेल, गणेश कडू, धनंजय म्हात्रे, मनोहर पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर रयत सेवक, महालन विभागातील सर्व ग्रामस्थ, पत्रकार, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. विद्या नावडकर डॉ.सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.