बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब

जूनपर्यंत मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर

। उरण । वार्ताहर ।

लोकलमुळे उरण शहरातील कोंडीत अधिकची भर पडली असून सातत्याने होणार्‍या कोंडीवर उपाय म्हणून सिडकोने उरण शहराला जोडणार्‍या बाह्यवळण मार्गाचे काम सुरू केले आहे. मात्र या बाह्यवळण रस्त्याची वाट बिकट झाली आहे. कारण हा मार्ग पूर्ण होण्यासाठीं सिडकोने निश्‍चित केलेली जून 2024 पर्यंतची मुदत वाढण्याची शक्यता आहे.

मागील 40 वर्षांत तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्याोगिक विकास वाढला आहे. त्यामुळे नागरीकरणातही वाढ झाली आहे. परिणामी शहरातील बाजारहाट करणारे नागरिक व त्यांच्या वाहनांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. यामध्ये सध्या तासाभरात ये-जा करणार्‍या लोकलमुळे उरणचे प्रवेशद्वार असलेल्या कोटनाका येथे वारंवार कोंडीत भर पडत असल्याने नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत. बाजारातील व्यावसायिकांचीही संख्या वाढली आहे. शहरात वाहनतळ नाही. त्यामुळे उरण शहरातील वाहतूक कोंडी ही नित्याची बनली आहे. सध्या तर बाजारात नागरिकांना कोणत्याही वेळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Exit mobile version