ऑलिम्पिकसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रक्रियेला विलंब

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रक्रिया यंदा लांबणीवर टाकण्यात येणार आहे. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्टला प्रत्येक वर्षी राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्तम क्रीडापटूंना सन्मानित केले जाते. परंतु, यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा होणार असल्याने ही प्रक्रिया विलंबाने राबवण्यात येणार आहे.


“यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी आमच्याकडे नियोजित तारखेपर्यंत बरीच नामांकने सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे नामांकन प्रक्रिया संपलेली आहे. परंतु समितीच्या अखेरच्या बैठकीत आम्ही ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा समावेश करण्याचे धोरण आखले आहे,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. ऑलिम्पिक स्पर्धा 8 ऑगस्टला संपेल. त्यानंतर निवड प्रकिया पूर्ण करण्यास घाई होणार असेल, तर पुरस्कार वितरण सोहळासुद्धा लांबणीवर पडू शकतो, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

Exit mobile version